breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिका आणि रशियन सैन्यांमध्ये सीरियात संघर्ष , ४ जवान जखमी

दमास्कस – जगातील दोन शक्तीशाली देश असलेले रशिया आणि अमेरिकेच्या सैन्यांमध्ये सीरियात तीव्र संघर्ष झाल्याचे समोर आले आहे. या संघर्षात काही सैन्य जखमी झाले आहेत. यु्द्धाच्या झळा सहन करत असलेल्या सीरियात अमेरिका-रशियाच्या सैन्यांमध्ये हा संघर्ष झाला. दरम्यान, अमेरिकेने रशियावर प्रोटोकॉल तोडल्याचा आरोप केला आहे.

रशियन सैन्याच्या एका गटाकडून आर्मर्ड व्हेइकलने अमेरिकन सैन्याला धडक दिली. त्यानंतर या सैन्यांमध्ये हाणामारी झाली असल्याचे वृत्त आहे. यामध्ये चारजण जखमी झाले आहेत. अमेरिकन सैन्यासोबत हाणामारी सुरू असताना रशियाने आपल्या हेलिकॉप्टरचाही वापर केला असल्याचे एका व्हिडिओत समोर आले आहे.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांनी सांगितले की, उत्तर पूर्व सीरियात अमेरिकन आणि रशियन सैन्य समोरासमोर आले. त्यावेळी त्यांच्यात वाद झाले. त्यातच रशियन आर्मर्ड व्हेइकलने अमेरिकेच्या आर्मर्ड व्हेइकलला धडक दिली. यामध्ये काही सैनिक जखमी झाले. तणाव कमी होण्यासाठी त्या भागातून अमेरिकन सैन्याने माघार घेतली असल्याचेही अमेरिकेने स्पष्ट केले आहे

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button