अबब… पुजा-यांनी परवानगी देताच सुरू झाली तुफान दगडफेक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/narkhed.jpg)
भोयरे | महाईन्यूज
नरखेड येथे श्री जगदंबा देवीच्या पुजा-यांनी परवानगी देताच सुरू झाली तुफान दगडफेक अन् पुन्हा बंदचा इशारा देताच दोन्ही गटातून दगडफेक बंद झाली़ जगदंबा देवी मंदिरासमोर हा दगडफेकीचा खेळ पार पडला. हा खेळ पाहण्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती.
धुलीवंदन दिवशी भोयरे येथे भाविक श्री जगदंबा देवी मंदिरातून दर्शन घेऊन पुजाºयासह भोगावती नदीच्या दिशेने गेले़ त्यानंतर नदीमध्ये लहान मुलांच्या कुस्त्या पार पडल्या़ सर्व भाविक गावाच्या वेशीवर येऊन दोन गटात विभागून दगड फेकले, नंतर ते दोन्हीही गट जगदंबा मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाले़ एक गट मंदिराच्या गाभाºयावर तर दुसरा गट मंदिराच्या पायथ्याशी उभा राहिला.
पुजारी मंदिरात पोहोचून खेळास परवानगी देताच दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक सुरू झाली. या दोन्ही गटामधील अंतर केवळ १५० ते २०० फूट आहे़ साधारणत: हा खेळ २० मिनिटे चालू राहिला. अखेर पुजाºयांनी खेळ बंदचा इशारा करताच दोन्हीही गट दगड फेकण्याचे थांबविले़ नंतर सर्वच भाविकांनी मंदिरात दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केल्याचे दिसून आले आहे. या दगडफेकीच्या खेळामध्ये काही भाविक जखमी झाले़ पण ते कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी गेले नाहीत तर मंदिरात जाऊन त्या जखमेवर देवीचा अंगारा लावला की जखम बरी होते, असे अनेक भाविकांनी सांगितले.