breaking-newsआंतरराष्टीय
अफगाणिस्तानात निवडणूक मेळाव्यावर आत्मघातकी हल्ला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/123123.jpg)
- १३ ठार; ४० जण जखमी
अफगाणिस्तानात निवडणूक प्रचार मेळाव्यावर करण्यात आलेल्या आत्मघातकी हल्ल्यात मंगळवारी किमान १३ जण ठार झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या शुक्रवारी संसदीय निवडणूक प्रचाराला अधिकृतपणे सुरुवात झाल्यानंतर करण्यात आलेला हा पहिलाच आत्मघातकी हल्ला आहे. पूर्वेकडील नांगरहर प्रांतातील कामा जिल्ह्य़ात अब्दुल नासीर मोहम्मद या उमेदवाराचा प्रचार सुरू असताना आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांच्या साहाय्याने स्वत:ला उडविले त्यामध्ये ४० जण जखमी झाले, असे प्रांतीय गव्हर्नरचे प्रवक्ते अताउल्लाह खोगयानी यांनी सांगितले. या हल्ल्यात मोहम्मद हे बचावले आहेत, मात्र अन्य १३ जण ठार झाले आहेत. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.