breaking-newsराष्ट्रिय

…अन् अजित डोवालांनी पोलिसांना सांगितली छत्रपती शिवाजी महाराज आणि जीवा महालाची गोष्ट

नवी दिल्ली | महाईन्यूज

गुरूग्राममध्ये आयोजित पोलिसांच्या कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी गुरूवारी हजेरी लावली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती, संगठन कौशल्य आणि माणसांची पारख करण्याची कला कशी होती, याची माहिती अजित डोवाल यांनी पोलिसांना दिली. तसेच, प्रशिक्षणादरम्यान कौशल्य विकसित होऊन प्रत्येक पोलीस जीवा महालासारखा तरबेज व्हावा, असेही अजित डोवाल यांनी सांगितले आहे. अजित डोवाल म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल नेतृत्त्वाचे उत्तम उदाहरण आहे. एकदा घोड्यावरुन जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी एका व्यक्तीला दांडपट्टा फिरवून उडते पक्षी मारताना पाहिले. त्याला आपल्या सैन्यात सहभागी करून घेतले. प्रशिक्षण दिले. त्याच्या कौशल्यास पैलू पाडले. त्याचे नाव होते जीवा महाला.”

ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा प्रतापगडावर अफझल खानाला भेटले तेव्हा त्यांच्या सोबत जीवा महाला होता आणि अफझल खानासोबत होता सय्यद बंडा. भेटीदरम्यान अफझल खानाने दगा केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर वार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी चिलखत घातले होते. त्यामुळे अफझल खानाचा वार फुकट गेला. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करण्यासाठी सय्यद बंडा धावून आला. त्याच्या हातात तलवार होती, ती तो महाराजांवर चालवणार इतक्यात अत्यंत चपळाईने जीवा महालाने बंडावर तलवार चालवली; सय्यद बंडाचा हात खांद्यापासून तुटला. यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व कौशल्य याठिकाणी दिसून येते, असे अजित डोवाल यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button