breaking-newsराष्ट्रिय

अखेर न्या. के. एम. जोसेफ यांच्या बढतीला केंद्राचा हिरवा कंदिल

नवी दिल्ली – केंद्र सरकारने अखेर न्या के एम जोसेफ यांच्या सर्वोच्च न्यायालयात झालेल्या बढतीला मान्यता दिली आहे. त्यामुळे त्यांची आता उत्तराखंड उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती केली जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने 10 जानेवारीला केंद्र सरकारकडे बढतीसाठी ज्या न्यायाधिशांच्या नियुक्तीची शिफारस केली होती, त्यात न्या जोसेफ यांचे नाव होते पण केंद्र सरकारने त्यावेळी त्यांच्या बढतीला अनुमती नाकारली होती. पण त्यांच्या नावाची कॉलेजियमकडून पुन्हा शिफारस आल्यानंतर मात्र केंद्राने त्यांच्या नियुक्तीला हिरवा कंदिल दाखवला आहे.

त्यांच्या नावांबरोबरच मद्रास उच्च न्यायालयाच्या इंदिरा बॅनर्जी आणि ओडिशा उच्च न्यायालयाचे न्या विनीत सरन यांचीही सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली आहे. या नवीन नियुक्‍त्यांमुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांची एकूण संख्या आता 25 झाली असून अद्याप तेथील सहा जागा रिक्त आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button