breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपा आमदार जगताप यांची आमदार लांडगे यांच्यावर राजकीय कुरघोडी

 

  • उपमहापौरपदी पुन्हा भोसरी मतदार संघातील हिराबाई घुले यांना संधी
  • आमदार लांडगे समर्थक वसंत बोराटे पुन्हा ‘वेटिंग’वर

पिंपरी । प्रतिनिधी

महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचे दोन कारभारी आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या ‘पिंपरी-चिंचवड शहराचे नेते’ होण्यासाठी राजकीय चढाओढ सर्वज्ञात आहे. त्यामुळेच आमदार जगताप यांनी भोसरी विधानसभा मतदार संघातच आमदार लांडगे यांना गुंतवून ठेवण्यासाठी ‘मास्टर गेम’ खेळताना दिसतात.

भोसरी विधानसभा मतदार संघातील नगरसेविका हिराबाई घुले यांना उपमहापौरपदी संधी देत आमदार जगताप यांनी पुन्हा एकदा आमदार लांडगे यांचे ‘स्पीड’ कमी करण्याची खेळी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये भाजपा सत्ता आली. सत्तेच्या काळात जगताप, लांडगे आणि जुना गट असे तीन गट भाजपामध्ये पदांचे भागिदार राहिले आहेत. मात्र, निर्णायक भूमिका लांडगे- जगताप जोडीची राहिली आहे.
महापालिकेतील पदवाटपामध्ये आमदार जगताप यांनी आपल्या वाट्याला आलेल्या पदांमधील महत्त्वाची सर्वाधिक पदे ही भोसरी मतदार संघातील समर्थक नगरसेवकांना दिली आहेत. भाजपाच्या सत्ताकाळातील पहिल्या स्थायी समिती सभापती सीमा सावळे, विलास मडिगेरी, सत्तारुढ पक्षेनेते एकनाथ पवार यांना संधी देत आमदार लांडगे राजकीयदृष्ट्या वरचढ होवू नयेत, अशी काळजी घेतली.

सध्या उपमहापौर पदासाठी नाराज नगरसेवक रवि लांडगे आणि वसंत बोराटे यांच्या नावाची चर्चा असताना ऐनवेळी आमदार जगताप यांनी आपल्या समर्थक नगरसेविका हिराबाई घुले यांचा पत्ता बाहेर काढला. त्यामुळे आता यापूर्वीच नाराज असलेले रवि लांडगे आणि आता वसंत बोराटे यांच्याही नाराजीचा फटका आमदार लांडगे यांना बसणार आहे.

वाचा- सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुलेंना भारतरत्न देण्याचा ठराव पुणे महानगरपालिकेकडून मंजूर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button