breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

पैसाच पैसा..काँग्रेस खासदाराकडे सापडलं ३५१ कोटींचं घबाड!

Dheeraj Sahu Cash Seized : गेल्या पाच दिवसांपासून ओडिशात प्राप्तिकर विभागाची मोठी कारवाई सुरू आहे. काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याशी संबंधित काही मालमत्ता व त्यांच्या निवासस्थानी टाकलेल्या छाप्यांमधून तब्बाल ३५१ कोटींची रोख रक्कम ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

धीरज साहू यांच्याशी निगडित मालमत्तांवरून ताब्यात घेण्यात आलेल्या या नोटा तब्बल १७६ बॅगांमध्ये भरून एसबीआयच्या बालंगीर, संबलपूर आणि तितलागड शाखांमध्ये नेण्यात आल्या होत्या. तीन शांखांमधील कर्मचाऱ्यांनी मिळून ही सगळी नोटामोजणी पाच दिवस राबून पूर्ण केली. या छाप्यात ताब्यात घेण्यात आलेल्या नोटा इतक्या होत्या, की त्या मोजायलाच प्राप्तिकर विभागाच्या पथकाला तब्बल पाच दिवस लागले. एखाद्या तपास यंत्रणेनं एका छाप्यात हस्तगत केलेली ही आत्तापर्यंतच्या इतिहासातली सर्वात मोठी रक्कम असल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा  –  मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा; म्हणाले, काड्या करत राहिले तर..

एसबीआयच्या बालंगीर शाखेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभानं जप्त केलेल्या नोटांची मोजणी करण्यासाठी आम्हाला पाच दिवस लागले. त्यासाठी एकूण २५ नोटा मोजणीच्या मशीन आणि तब्बल ५० बँक कर्मचारी ओव्हरटाईम व शनिवार-रविवारदेखील काम करून नोटामोजणी करत होते. यातून जमा झालेली एकूण रक्कम ३०५ कोटी आहे. बालंगीर शाखेव्यतिरिक्त एसबीआयच्या संबलपूर शाखेत ३७.५० कोटी रुपयांच्या तर तितलागड शाखेत ११ कोटी रुपयांच्या नोटांची मोजणी झाली. त्यामुळे जप्त केलेल्या नोटांची एकूण रक्कम ३५० कोटींच्या पुढे गेली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button