breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

सावधान! कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट तर विदर्भातही मुसळधार पाऊस

Weather News : राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत असल्याचं चित्र दिसत आहे. कुठं जोरदार पाऊस पडतोय, तर कुठं हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतोय. दरम्यान, आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातही आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जाणून घेऊयात हवामानाच्या अंदाजाबद्दल सविस्तर माहिती.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा    –   राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंदर्भातील सर्वात मोठी बातमी!

दरम्यान, आज संपूर्ण विदर्भात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह, ठाणे पालघर या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मान्सूनने (Monsoon) संपूर्ण महाराष्ट्र काबिज केला आहे. सध्या मान्सूनचा काही प्रमाणात वावर हा घाटमाथ्यावर जाणवू लागला आहे. त्यामुळं जूनच्या या शेवटच्या संपूर्ण आठवड्यात म्हणजे 30 जून पर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे मत ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळं राज्यातील जनतेनं योग्य ती खबरदारी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी पेरणी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, अनेक भागात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. त्या भागात चांगल्या पावसाची गरज आहे. शेतकरी पावसाची प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी कर नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button