breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘अजित दादांना हाती घेऊन शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न’; बच्चू कडूंचं विधान

Bacchu Kadu | एकनाथ शिंदेंच्या साथीने सरकार सुरळीत चालू असतानाही भाजपाला अजित पवारांची गरज का लागली? असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. आता यावरून प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. शिंदेंना शह देण्याकरता तुम्ही अजित दादांना घेतलं आणि अजित दादांना हाती घेऊन शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न केला असल्याचं ते म्हणाले आहेत.

बच्चू कडू म्हणाले, अजितदादांबरोबरही असंच झालंय. दोन उसने उमेदवार त्यांना दिले. असा युती धर्म असतो का? एकनाथ शिंदेंच्या साथीने युतीचं सरकार सुरळीत चालू होता. परंतु, शिंदेंना शह देण्याकरता तुम्ही अजित दादांना घेतलं आणि अजित दादांना हाती घेऊन शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न केला. अधिकचं राजकारण लोकांना पटत नाही.

हेही वाचा    –     आनंदाची बातमी! शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज २००० रुपये जमा होणार! 

परभणी, हिंगोली, यवतमाळ, नांदेडच्या जागा बदलल्या. नाहीतर अधिक जागा वाढल्या असत्या. शिवसेनेच्या जागेवर भाजपाने सर्व्हे केला. शिंदेंचा उमेदवार भाजपाने ठरवला. उमेदवार शिंदेंचे आणि भाजपा सर्वे करणार. ही नवीनच पद्धत आहे. हे म्हणजे नाक दाबून बुक्क्यांचा मार आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

खरं तर नवनीत राणा यांच्या पराभवाचा कट हा युवा स्वाभीमानी पक्षाचा आहे. नवनीत राणा जेव्हा खासदार होत्या, तेव्हा रवी राणा हे कुठेच दिसत नव्हते. त्यामुळे अंतर्गत कलहामुळे त्यांचा पराभव झाला. आमचा काहीही वाद नाही. रवी राणा यांनी फक्त तोंड सांभाळलं असतं तरी नवनीत राणा निवडून आल्या असत्या. मातोश्रीवरून रसद पुरवल्याच्या आरोपावर बोलाताना या विरोधात दोन दिवसांत न्यायालयात जाणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button