breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

शरद पवारांचं नाव घेताच अजित पवार भडकले; म्हणाले..

पुणे | एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निवाडा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केला आहे. या निकालानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारल्यावर ते संतापल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करणार का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. अहो आमचं सरकारच चालू आहे. मग, कधी अभिनंदन करायचं मी ठरवेन. तुम्ही मला कशाला सांगता.. मला फुकटचे सल्ले देण्याच्या भानगडीत पत्रकारांनी पडू नये, असं म्हणत अजितदादांनी पत्रकारांना खडसावलं.

हेही वाचा   –  स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांवर महाराष्ट्राची मोहोर

माझा स्वभाव सरळमार्गी आहे. तुम्ही एखाद्याचं नाव घेत प्रतिक्रिया विचारता. मुळात कोण काय काय बोलले, याच्याशी मला देणं-घेणं नाही. त्याचं मत त्यांनी व्यक्त केलेलं असतं. मी माझं मत मांडण्यासाठी बसलो आहे. आपल्याकडे वाचाळवीर भरपूर आहेत. रोज वाचळवीरांना काहीतरी विधानं केल्याशिवाय झोपच लागत नाही. आता प्रत्येक वाचाळवीराला उत्तर देणं, हे माझं काम नाही. मला मिळालेल्या संधीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न आणि अडचणी सोडण्याचं काम मी करतो, असं अजित पवार म्हणाले.

राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर आपली प्रतिक्रिया काय? या प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, जो निर्णय तुम्ही ऐकला तसा मीही ऐकला आहे. न्यायाधीशांनी दिलेला निर्णय आपण योग्यच समजतो. शरद पवर यांनी निकालाचा वेगळा अर्थ काढला आहे, असा प्रश्न विचारता अजित पवार चांगलेच चिडले. कोण काय भूमिका मांडतात, याच्याशी मला देणं-घेणं नाही. मी माझ्यापुरतं बोलत असतो, असं अजित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button