breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

धक्कादायक! ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात एका रात्रीत तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू

मुंबई : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात एका रात्रीत तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत्यू झालेल्या १७ पैकी आयसीयूमधील १३ रूग्ण तर जनरल वॉर्डमधील ४ रूग्ण होते. याआधी १० ऑगस्ट रोजी ५ जणांचा मृत्यू झाला होता. आता १७ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

रूग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काही रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटलमधून शेवटच्या क्षणी आल्याने तर काही रुग्ण ८० पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. मात्र सिव्हिल रुग्णालय बंद झाल्यापासून ठाणे जिल्ह्यातील सर्व रुग्ण इथेच येत असल्याने डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे.

हेही वाचा – अक्षय कुमरावर थुंका, १० लाख रूपये मिळवा, नेमकं काय आहे प्रकरण?

दरम्यान, १० ऑगस्ट रोजी ५ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. वेळेत उपचार न मिळाल्यान या रूग्णांचा मृत्यू झाला होता. यामध्ये एका रूग्णाचा ह्रद्यविकाराच्या झटक्याने, उलटी झाल्याने एका रूग्णाचा, एक अज्ञात आणि एका रूग्णाच्या पायाला गळू झाला होता. तर एका गरोदर मातेचे मृत्यू झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button