breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराष्ट्रिय

Anupam Kher : चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनुपम खेर यांना झाली दुखापत

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर हे नेहमीच चर्चेत असतात. ते आपल्या आगांमी ‘विजय ६९’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. अनुपम खेर यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून अनुपम यांनी त्यांना झालेल्या दुखापतीबद्दल सांगितलं आहे.

हेही वाचा – २००० नोटांसंदर्भात RBI ने बँकांना जारी केल्या महत्वापूर्ण सूचना

अनुपम खेर यांनी इन्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या हाताला ब्लॅक कलरची स्लिंग लावलेली दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अनुपम खेर यांनी म्हटलं आहे की, तुम्ही स्पोर्ट्स फिल्म करता आणि तुम्हााला दुखापत झाली होती. हे वेदनादायक आहे, पण खांद्यावर Sling लावणाऱ्या भावाने जेव्हा सांगितले की, त्याने शाहरूख आणि ह्रतिक यांच्या खांद्याला पण हे Sling लावले होते, तेव्हा वेदना कमी झाल्या. पण जर मला थोडी जोरात खोकला आला तर नक्कीच वेदना होतात! फोटोत हसण्याचा प्रयत्न Genuine आहे. एक-दोन दिवसांनी शूटिंग पुन्हा सुरू करेल..बाय द वे, हे जेव्हा आईला कळाले तेव्हा ती म्हणाली, अजून बॉडी जगाला दाखवा, तुला नजर लागली आहे. यावर मी उत्तर दिले, आई! युद्धाच्या मैदानात फक्त योद्देच पडतात. मग आईनं मला थप्पड मारण्यापासून स्वत:ला थांबवलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button