breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

ओटीटीवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी! घरबसल्या पाहता येणार हे चित्रपट

Entertainment : या आठवड्यात अनेक चित्रपट, वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा हा विकेंड अगदी मजेत जाणार आहे. कारण सनी देओलपासून ते अक्षय कुमारपर्यंत अगदी हिट चित्रपट व वेबसिरीज या आठवड्यात वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्या आहेत. त्यामुळे या आठवड्यात प्रेक्षकांना चित्रपटांची मेजवानी पाहायला मिळणार आहे. तर पाहुयात या आठवड्यात कोणकोणते चित्रपट, वेबसिरीज होणार आहेत..

OMG २ : अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम या स्टार कलाकारांचा OMG २ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज झाला आहे. हा चित्रपट २०१२ च्या OMG या चित्रपटाचा सिक्वेल आहे. आता OMG २ हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. आता हा चित्रपट ८ ऑक्टोबर रोजी Netflix या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यासंदर्भात Netflix या OTT प्लॅटफॉर्मने त्यांच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्टर रिलीज करत प्रेक्षकांना माहिती दिली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या आठवड्याच्या शेवटी OMG २ हा चित्रपट ओटीटीवर पाहता येणार आहे.

हेही वाचा – मध्यप्रदेश, छत्तीसगडसह ५ राज्यांच्या निवडणुका जाहीर, पाहा संपुर्ण माहिती..

MUMBAI DIARIES’ SEASON २ : मुंबई डायरी सीझन २ ही वेबसिरीज ६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. मुंबई डायरी सीझन २ ही वेबसिरीज २६ ते २९ नोव्हेंबर २००८ या काळात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या काळोख्या घटनेवर आधारित आहे. या वेबसीरिजचे दिग्दर्शन आणि लेखन निखिल अडवाणी यांनी केले आहे. तसेच मोनिषा अडवाणी, मधु भोजवानी आणि निखिल अडवाणी यांनी या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. या वेबसीरीजमध्ये मोहित रैना, प्रकाश बेलावाडी, कोंकणा सेन शर्मा, श्रेया धन्वंतरी, रिद्धी डोगरा, सत्यजीत दुबे, नताशा भारद्वाज, टीना देसाई असे बरेच कलाकार आहेत. प्रेक्षकांना आता या वेबसिरीजचा आनंद घरबसल्या घेता येणार आहे.

Gadar २ : गेल्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या गदर २ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आता गदर २ हा सिनेमा ६ ऑक्टोबरला Zee५ या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट २००१ च्या ब्लॉकबस्टर हिट गदर: एक प्रेम कथाचा सिक्वेल आहे. या सिनेमात अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. आता प्रेक्षकांना या सिनेमाची मेजवानी घरबसल्या पाहता येणार आहे.

Khufiya : खुफिया हा चित्रपट ५ ऑक्टोबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. हा एक भारतीय स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. अमर भूषण यांच्या एस्केप टू नोव्हेअर या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात तब्बू भारतीय गुप्तहेर एजन्सी R&AW ची ऑपरेटिव्ह म्हणून काम करते ज्याला संरक्षण गुपिते विकणाऱ्या एका मोलचा शोध घेण्यासाठी नेमण्यात आले आहे. या चित्रपटात तब्बू, अली फजल आणि वामिका गब्बी यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button