कानमध्ये दीपिका झाली ट्रोल
कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये पिंक हेवी रफल्ड गाऊनमध्ये आली. त्या गाऊनपेक्षा जास्त चर्चा झाली ती दीपिकाच्या लुकची. कारण या गाऊनमध्ये आलेल्या दीपिकाने एका क्षणी चक्क जीभ हातभर काढली होती. तिचे ते फोटो पटापट व्हायरल झाले आणि चक्क रणवीर सिंहनेही तिच्या या फोटोवर कॉमेंट केली आहे. “अरे अरे गुलाबो, हाहाहाहा’ असे म्हणत त्याने दीपिकाची चेष्टाच केली. दीपिकाच्या बहुतेक सगळ्या फोटोंवर रणवीरने कॉमेंट केले आहेत. एका फोटोवर तर चक्क “उफ्फ….’ एवढीच कॉमेंट त्याने केली आहे. त्याच्या या एकाच शब्दातून त्याच्या भावना व्यक्त झाल्या आहेत. दीपिकाच्या लुकचे अनेकांनी कौतुकही केले आहे. मात्र त्याबरोबर ट्रोलिंगही झाले आहे. इंटरनेटवर तिला भरमसाठ “डिसलाईक’ मिळायला लागले. लोकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली.
दीपिकाने मिडीयाला जीभ दाखवणे असभ्यपणाचे मानले जायला लागले आहे. तिच्या या कृतीची चेष्टा करताना अनेकांनी तिची तुलना ज्युरासिक पार्कमधील डायनासोरबरोबर केली आहे. एकाने तर दीपिकाच्या फोटोबरोबर या डायनासॉरचा फोटोही पोस्ट केला आहे.
लोकांनी तिला ट्रोल केले तरी तिचे फॅन्स तिच्यावर नाराज होणार नाहीत. जेवढे भारतातले फॅन्स दीपिकापायी येडे झालेत तेवढेच विदेशातही आहेत. ऑलराऊंडर क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्होने नुकतेच हरभजन सिंगच्या टॉक शो मध्ये दीपिका आपली सर्वात आवडती ऍक्ट्रेस असल्याचे सांगितले आहे. दीपिकाबरोबर आमने सामने बसून चॅट करण्याची आपली ईच्छा असल्याचे ब्राव्हो म्हणाला. त्याने दीपिकाला जरी कॅमेऱ्यासमोर पसंती दिली असली तरी त्याने नताशा सुरी नावाच्या मॉडेलबरोबर डेटिंग केले आहे. ही नताशा सुरी 2006 साली मिस इंडिया विजेती आहे. तिचे टिव्ही शो पण सुरू आहे. ब्राव्होच्या “आयपीएल’ मॅच बघायला ती अनेकवेळा आली होती. ब्राव्हो आणि नताशाने आपले रिलेशन अद्याप खुले केलेले नाही. मग दीपिकाचे नाव कशाला घेतले याने.