Breaking-news
‘ड्रायव्हिंग करताना मोबाइलवर बोलणे बेकायदेशीर नाही’- केरळ उच्च न्यायालय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/high-court-of-kerala-.jpg)
नवी दिल्ली : ड्रायव्हिंग करत असताना मोबाइल फोनवर बोलणे बेकायदेशीर नसल्याचं केरळ उच्च न्यायालयाने आपल्या एका आदेशात म्हटलं आहे. न्यायालयाने सांगितलं आहे की, जोपर्यंत ड्रायव्हिंगमुळे लोकांची सुरक्षा धोक्यात येत नाही तोपर्यंत त्याला बेकायदेशीर म्हणू शकत नाही.
कार चालवत असताना मोबाइलचा वापर करणे लोकांसाठी तसंच सार्वजनिक संपत्तीसाठी धोक्याचं आहे असं म्हणू शकत नाही, कारण कोणताही कायदा असं करण्यापासून रोखत नाही असा निष्कर्ष केरळ उच्च न्यायालयाने मांडला आहे. कोच्ची येथील रहिवासी संतोष एम जे या व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने हा निष्कर्ष काढला आहे. संतोष यांच्यावर पोलिसांनी ड्रायव्हिंग करताना फोनवर बोलत असल्याने गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयाने कोणताही दंड वसूल न करता प्रकरण निकाली काढलं.