Breaking-newsमहाराष्ट्र
दौंड विधानसभेच्या तयारीला वेग बापूराव सोलनकर यांची”राष्ट्रवादीच्या “पक्ष निरीक्षक पदी निवड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/IMG-20190620-WA0004.jpg)
दौंड (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दौंड विधानसभा मतदार संघाची निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेले बापूराव सोलनकर यांची नियुक्ती राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुले,यांच्या सूचनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल यांनी सोलनकर यांची निवड केली, थोड्याच दिवसामध्ये विश्वासाला पात्र ठरलेल्या सोलनकर यांच्यावर अजितदादा पवार यांनी मोठी जबाबदारी दिली आहे. सोलनकर यांनी यापूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे बारामती लोकसभा मतदार संघाचे प्रभारी म्हणून काम केले आहे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते, बारामती मध्ये रासप वाढवन्यामध्ये सोलनकर यांचे खुप मोठे योगदान होते .सोलनकर यांचा संपर्क दौंड तालुक्यामध्ये चांगला आहे त्यांचे संघटनात्मक काम चांगले आहे.
या कामाचा विचार करुन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलनकर यांना दौंड विधानसभा मतदार संघाची जबाबदारी दिली आहे,या निवड़ीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा बैंकेचे अध्यक्ष, रमेश आप्पा थोरात, दौंड तालुका अध्यक्ष, आप्पासाहेब पवार, बारामती तालुका अध्यक्ष, संभाजी होळकर, यांनी सोलनकर यांचे निवडी बद्दल अभिनंदन केले.
दौंड चा मतदारसंघ हा “रासप” कड़े आहे. राहुल कुल हे रासप चे आमदार आहेत. रासप च्याच जुन्या शिलेदाराला पक्ष निरीक्षक ही जबाबदारी देऊन एक प्रकारे राहुल कुल यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे.