महानायक अमिताभ बच्चन यांचे ट्विटर हँडल हॅक, प्रोफाईलला पाकच्या पंतप्रधानांचा फोटो
मुंबई – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे ट्विटर हँडल कल (१० जून) रात्री हॅक करण्याचा प्रकार घडला आहे. या हॅकर्सने अभिताभ यांच्या ट्विटर हँडलचा प्रोफाईल फोटो बदलून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावला. ऐवढेच नव्हे तर, बिग बींचा बायोमध्ये बदल करून “लव्ह पाकिस्तान” असे लिहिले. या संपूर्ण प्रकारनंतर बिग बींचे ट्विटर हँडल नेमके कोणी हॅक केले हे अद्याप कळू शकले नाही. परंतु पाकिस्तान समर्थक हॅकर्सचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर रात्री उशिरा त्यांचे अकाउंट पुन्हा ‘रिस्टोअर’ झाले.
बिग बींच्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. ट्विटरच्या माध्यमातून ते त्यांचे विचार, मते ते नेहमी त्यांच्या चाहात्यांसोबत शेअर करत असतात. ट्विटरसह इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ते बिग बी माहिती अपडेट करतात. त्यांच्या कविता ते शेअर करत असतात. त्यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची बातमी त्यांचे चाहते आणि सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. या प्रकराची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाला देण्यात आली. या प्रकरणी ते अधिक तपास करत आहेत.
तुर्कीचा फुटबॉल संघ काही दिवसांपूर्वी यूरो २०२० चा क्वॉलिफाईंग सामना खेळण्यासाठी आईसलॅण्डला गेला होता. तिथे पोहोचल्यानंतर तुर्कीच्या खेळाडूंची विमानतळावर कसून चौकशी करण्यात आली होती. हॅकर्सने अमिताभ बच्चन यांच्या ट्विटर हॅण्डचा वापर करून निषेध नोंदविला.