सलमानच्या शेरेबाजीमुळे जॅकलीनचा चेहरा उतरला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/Salman-jackeline.jpg)
जॅकलीन फर्नांडिसने आतापर्यंत डझनभर सिनेमे केले आहेत. पण अजूनही तिला स्पष्ट, शुद्ध हिंदी बोलता येत नाही. काही वेळा तिला हिंदी समजतही नाही. हिंदीच्या सदोष वापरामुळे तिची अनेकवेळा चेष्टाही झाली आहे. अलिकडेच सलमान खाननेही तिच्या हिंदीवरून तिची चांगलीच टर उडवली. इतरांनी केलेली चेष्टा जॅकलीनने कॅज्युअली घेतली असती. पण सलमानने सगळ्यांच्या समोर तिची टर उडवल्याने तिचा चेहराच उतरला होता.
सलमानच्या “रेस 3’च्या ट्रेलर लॉंचिंगच्यावेळी काही पत्रकारांनी जॅकलीनला हिंदीतून प्रश्न विचारले होते. पण तिला हा प्रश्नच समजला नाही. जॅकलीन अडचणीत असल्याचे बघून सलमानने तिची चेष्टा करायला सुरुवात केली. “जॅकलीनला हिंदीतून प्रश्न विचारायला लाज वाट नाही.’ असे त्याने चेष्टेच्या स्वरात प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला छापले. त्यावर त्या पत्रकारानेही “जॅकलीन हिंदी सिनेमात काम करते, पण तिला हिंदी येत नाही आणि आम्हाला इंग्लिश येत नाही.’ असे त्याच थाटात ऐकवले. मात्र ही डायलॉगबाजी ऐकल्यावर जॅकलीनचा चेहरा मात्र खर्रकन उतरला. तिला त्यानंतर काहीच बोलता आले नाही. मात्र यावर इतरांनी हसून खेळून स्वतःचे मनोरंजन करून घेतले.
एवढ्यावर गप्प बसेल तो सलमान कुठला. त्याने जॅकलीनचा नाद सोडला आणि बॉबी देओलची टांग खेचायला सुरुवात केली. बॉबी देओल म्हणजे चिकनी बॉडीवाला “बॉबी डॉल’ झाला असल्याचे तो म्हणाला. “रेस 3’मध्ये सलमान बरोबर बॉबी देओल एकाच फ्रेममध्ये शर्ट काढून उघडे दिसत आहेत. सलमानच्या सिक्स पॅक बॉडीला जणू बॉबीने चॅलेंजच दिले. अर्थात यासाठी सलमाननेच बॉबी देओलला प्रेरणा दिली. त्याच्या वेळापत्रकात बदल करायला लावले आणि स्वतःच्या फिटनेस ट्रेनरला बॉबीच्या मदतीसाठी पाठवून दिले होते. अर्थात बॉबीने यासाठी सलमानचे मनःपूर्वक आभारही मानले. सलमानने डायरेक्टर रेमो डिसोझाचीही चेष्टा केली. इतरांनी आपली चेष्टा हसत खेळत घेतली मात्र जॅकलीनचा चेहरा मात्र शेवटपर्यंत उतरलेलाच होता.