घराची भिंत कोसळून दोघांचाही मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Junnar-death.jpg.jpg)
पुणे – वादळी वाऱ्यासह पावसाने संपूर्ण घर कोसळून भिंतीच्या ढिगाऱ्याखाली आल्याने दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला. तर एक वृद्ध महिलाही गंभीर जखमी झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या ओतूर परिसरातील डोमेवाडी इथे ही धक्कादायक घटना घडली. जखमी महिलेवर आळे फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सहा वर्षीय वैष्णवी भुतांबरे आणि दोन वर्षांचा कार्तिक केदारचा या घटनेत दुर्दैवी अंत झाला. तर चिमाबाई केदार-वय 70 या जखमी झाल्या आहेत. दुपारी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास कार्तिक आणि वैष्णवी ही घरासमोरील अंगणामध्ये खेळत होते. त्यावेळी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. पावसापासून वाचण्यासाठी दोघेही जवळ असलेल्या घरात गेले.
त्याचवेळी जोरदार सुटलेला वादळी वारा आणि पाऊस यामुळे संपूर्ण घर कोसळेल. त्यामुळे घरात गेलेले कार्तिक आणि वैष्णवी यांच्या अंगावर भिंत कोसळून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. तर चिमाबाई केदार या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर आळे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.