Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
रमजान ईद निमित्त शहरात सुरळीत पाणी पुरवठा करा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/ramzan-10_5-730x445.jpg)
- मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांची मागणी
पिंपरी ( महा ई न्यूज ) – मुस्लिम बांधवाचा रमजान ईद निमित्त पिंपरी चिंचवड शहरात एक दिवसाआड असलेले पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केली.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणा-या पवना धरणात 19 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे 15 जुलैअखेर पाणी पुरवठा पुरेल याकरिता महापालिकेने पाण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी शहराला दिवसाआड पाणी पुरवठा केलेला आहे. मात्र, मुस्लिम बांधवाचा रमजान ईद हा महत्वाचा सण आहे. यामुळे शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होणे अपेक्षित आहे. त्यामुळे 5 किंवा 6 जून रोजी ज्या दिवशी रमजान ईद असेल त्यादिवशी संपुर्ण वेळ शहरात पाणी पुरवठा करावा, अशी मागणी चिखले यांनी केली आहे.