खासदार बारणे यांच्या विजयाचा पिंपरी-चिंचवडमध्ये जल्लोष
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/IMG-20190523-WA0028.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय झाल्याने पिंपरी-चिंचवडमधील शिवसैनिकांनी आतषबाजी करून विजयाचा जल्लोष साजरा केला आहे.
मावळ लोकसभा मतदार संघात शरद पवार यांचे नातू पार्थ पवार निवडणुकीत उतरताच त्यांच्या विजयाचे भाकीत केले जात होते. मात्र, मावळ मतदार संघ दोनवेळा शिवसेनेकडे शाबूत राहिला आहे. यावेळी पार्थ पवार यांच्या उमेदवारीने शिवसेनेची ही आशा मावळली होती. मात्र, बारणे यांची लोकप्रियता आणि केलेल्या कामावर लोकांनी मते दिल्याचा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. बारणे यांनी 2 लाख 14 हजार मतांची आघाडी घेऊन पार्थ पवार यांचा पराभव केला आहे.
श्रीरंग बारणे यांच्या विजयाने पिंपरी-चिंचवडमधील शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. काळेवाडी, थेरगाव, वाकड परिसरात आतषबाजी करत विजयोत्सव साजरा केला.