खासदार आढळराव पाटील यांचा अमोल कोल्हे यांच्याकडून पराभव
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शिरूर लोकसभा मतदार संघात सलग तीनवेळा खासदार राहणारे शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी पराभव केला आहे.
शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार कोल्हे यांनी लढत दिली होती. अमोल कोल्हे हे लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांनी आढळराव पाटलांना आव्हान दिले होते. तरी, आढळराव पाटील यांनी सलग तीनवेळा खासदारकी शाबूत ठेवली होती. यावेळी देखील त्यांना यश मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, कोल्हे यांनी आढळराव यांचा मताधिक्यांनी पराभव केला आहे.
अमोल कोल्हे हे संभाजी आणि शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणा-या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते आहेत. त्यामुळे त्यांना प्रचारात कष्ट घेण्याची वेळ आली नाही. त्यांची लोकप्रियता पूर्वीचीच असल्यामुळे त्यांना या निवडणुकीत घवघवीत यश मिळविता आले आहे.
- अमोल कोल्हे – 6 लाख 6 हजार 533
- शिवाजीराव आढळराव पाटील – 5 लाख 50 हजार 376
- मताधिक्य – 56 हजार 157