जर ‘ईव्हीएम हॅक’ नसेल तर राज्यात आम्ही 48 जागा जिंकू – प्रकाश आंबेडकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/prakash-ambedkar.gif)
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी काही तास उरले आहेत. विरोधकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. जर ईव्हीएम हॅक झाले नाही तर राज्यात आम्ही ४८ जागा जिंकू असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.
आंबेडकर हे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, देशभरात पुन्हा एनडीएला बहुमत मिळणार नाही. अशी शक्यता व्यक्त केली. एक्झिट पोलवर मला बोलायचे नाही पण ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर ईव्हीएममध्ये गडबड झाली नसेल तर भाजपा-शिवसेना युतीच्या जागा कमी होतील असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
सोलापूर, अकोला, सांगली, वर्धा, नागपूर, नाशिक अशा विविध मतदारसंघात चांगली लढत झाली आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला निश्चित यश मिळेल. मुस्लिम मतदारांनी युती-आघाडी दोघांनाही नाकारले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला राज्यात सर्व जागा मिळतील असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.