‘कान्स’मध्ये कंगना रणौतचा देसी अंदाज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/kangana.png)
संपूर्ण जगाचे लक्ष वेधलेल्या ‘कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’ला सुरुवात झालेली असून बॉलिवूडच्या तारका आपल्या अदांनी चाहत्यांना भुरळ पाडण्यास सज्ज झाल्या आहेत. अभिनेत्री कंगना रणौतने आपल्या ‘देसी’ अंदाजात रेड कार्पेटवर येऊन सगळ्यांवरच एक खास छाप पाडली. ‘फाल्गुनी आणि शेन पीकॉक’ या ब्रॅण्डच्या सोनेरी रंगाच्या कांजीवरम साडीत कंगना खूपच सुंदर दिसत होती.
कंगनाने कान्ससाठी तयारी करतांनाच फोटो तिच्या इंस्टाग्रामवरून शेअर केला होता आणि त्यानंतर तासाभरातच तिने रेड कार्पेटवरील तिच्या लूकचा फोटो शेअर केला.बंगळुरूच्या ‘मधुराया क्रिएशन’ची साडी आणि ‘फाल्गुनी आणि शेन पीकॉक’चे कॉर्सेट तिने परिधान केले होते. कंगनासोबत दीपिका आणि प्रियंकानेसुद्धा रेड कार्पेटसाठी तयारी करतानाचे फोटो शेअर केले होते.कंगनाने कान्ससाठी दहा दिवसात जवळपास पाच किलो वजन कमी केले आहे.इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना कंगनाने ‘राणीचे आगमन झाले आहे’असेही लिहिले आहे.
संपूर्ण सिनेसृष्टीत प्रतिष्ठित मानला जाणारा ‘कान्स चित्रपट महोत्सव’ १४ मे रोजी सुरु झाला आहे. ऐश्वर्या राय बच्चन,सोनम कपूर अहुजा,हुमा कुरेशी,डायना पेंटी या अभिनेत्री सुद्धा कान्सला हजेरी लावणार आहेत.