अजयने सांगितलं तब्बूच्या लग्न न करण्यामागचं कारण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/ajay-and-tabu.jpg)
‘हम नौजवान’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री तब्बूने आजवरच्या कारकिर्दीमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. हिंदी चित्रपटांपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या तब्बूने तमिल, तेलुगू, मल्याळम, बंगाल आणि हॉलिवूड चित्रपटही केले आहेत. सुपरहिट चित्रपट देणारी ही अभिनेत्री अजूनही विवाहबंधनात अडकलेली नाही. त्यामुळे अनेक वेळा तिला लग्नासंदर्भात प्रश्न विचारण्यात येतात. यावेळीदेखील तिला असाच प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र या प्रश्नाचं उत्तर तब्बूने नव्हे तर अभिनेता अजय देवगणने दिलं आहे.
लग्नासाठी योग्य व्यक्ती मिळत नसल्यामुळे मी लग्न करत नाही, असं तब्बूने अनेक वेळा सांगितलं आहे. मात्र तब्बूच्या लग्न न करण्यामागे एक वेगळंच कारण असल्याचं अजयने सांगितलं. काही दिवसांपूर्वी ‘दे दे प्यार दे’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी अजयने या गोष्टीचा खुलासा केला.
“तब्बूला आजपर्यंत माझ्यासारखा मुलगा मिळालेला नाही. त्यामुळेच ती अजूनही अविवाहित आहे”, असे मजेशीर उत्तर अजयने यावेळी दिलं. अजयने जरी हे उत्तर मजेशीर अंदाजात दिलं असलं तरी तब्बू खरंच लग्न का करत नाही ? हा प्रश्न तिच्या चाहत्यांना नक्कीच पडला असावा. दरम्यान, तब्बू आणि अजय देवगण यांची मुख्य भूमिका असलेला ‘दे दे प्यार दे’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बू बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.