Breaking-newsआंतरराष्ट्रीय
येमेन मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात अलकायदाचे तीन दहशतवादी ठार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/usa.jpg)
साना – अमेरिकेने येमेनच्या दक्षिण भागात केलेल्या ड्रोन हल्ल्यात अलकायदाचे तीन गनिम ठार झाले. अलकायदाचे गनिम एका वाहनातून जात असताना त्यांच्या वाहनावर हा ड्रोन हल्ला करण्यात आला. शाब्वा प्रांतात सोमवारी हा प्रकार घडला. अलकायदाच्या येमेन मधील घटकांकडून अमेरिकेच्या आस्थापनांवर सातत्याने हल्ले करण्यात येत आहेत.
त्यामुळे अमेरिकेने त्यांच्यावर चांगलीच पाळत ठेवली असून ड्रोन मधून त्यांच्या ठिकाणांवर सातत्याने हल्ले करण्यात येत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून अलकायदा आणि इस्लामिक स्टेटच्या गनिमांनी येमेन मध्ये उच्छाद मांडला आहे. त्यांच्यावर पुर्ण नियंत्रण मिळवण्यात अजून पर्यंत तरी यश आलेले नाही.