Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याचे वृत्त खोटे – आनंदराज आंबेडकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/g_1557044596.jpg)
मुंबई- काँग्रेस प्रवेशाचे वृत्त धादांत खोटं असल्याचे स्पष्टीकरण रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिले आहे. काही वृत्तसंस्थांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश’ अशा मथळ्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. आता स्वत: आनंदराज आंबेडकर यांनी पुढे येऊन यासंदर्भातील गैरसमज दूर केला आहे. काँग्रेस प्रवेशाचे वृत्त खोटे असल्याचे स्पष्टीकरण आनंदराज आंबेडकरांनी दिले.
आनंदराज आंबेडकर नेमके काय म्हणाले?
”काँग्रेस प्रवेशाचे वृत्त धांदात खोटे आहे. या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. ज्यांनी ही बातमी दिली, त्यांच्याकडून आंबेडकरी चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. काँग्रेसमध्ये कुठलाही प्रवेश केलेला नाही. या बातमीत कुठलेही तथ्य नाही.”, असे स्पष्टीकरण आंबेडकर यांनी दिले आहे. त्यासोबतच, ”दिल्लीत आमची ताकद नाहीये. दिल्लीत आम्ही कुठलाही उमेदवार दिलेला नाही. आम्ही दिल्लीचे युनिटही बरखास्त केले आहे. मी मागील आठ दिवसांपासून मुंबईत आहे, दिल्लीत जायचा प्रश्न नाही.” असेही आंबेडकर म्हणाले.