अमेरिकेकडून अन्य देशांना पुरवल्या जाणाऱ्या औषधांच्या किंमती वाढल्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/trump.jpg)
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अन्य देशांना पुरवल्या जाणाऱ्या औषधांच्या किमती वाढवण्याचा निर्देश दिला आहे. अमेरिकेच्या संशोधन आणि विकासाच्या खर्चाद्वारे ही औषधे तयारी केली जातात, परंतु ती अन्य देशांना अत्यंत कमी दरात पुरविली जातात, जे अयोग्य असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेत औषधांच्या किमती कमी करण्याच्या धोरणाचा प्रभाव भारत-अमेरिकेच्या द्विपक्षीय संबंधांवर पडू शकतो.
अन्य देश कमी किमतीत अमेरिकेकडून औषधे घेतात, परंतु याचा भार येथील नागरिकांवर पडतो. काही प्रकरणांमध्ये दुसऱया देशांमध्ये जी औषधे काही डॉलर्समध्ये मिळतात, त्याच औषधांसाठी अमेरिकेत शेकडो डॉलर्स द्यावे लागतात. हा प्रकार अस्वीकारार्ह असल्याचे ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये बोलताना म्हटले. अमेरिकेसोबत दीर्घकाळ फसवणूक होऊ देणार नाही. सर्वांसाठी ग्लोबल फ्रीलोडिंग संपविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.