breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसह कुटूंबियांनी केले मतदान

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाची निवडणुक चौथ्या टप्यात होत आहे. आज सोमवारी (दि. २९) पिंपरी-चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात सकाळी सात वाजता उत्साहात मतदानाला सुरूवात झाली. सकाळीच अनेक मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसत होती. मात्र, दुपारनंतर उन्हाचा पारा वाढल्याने आता बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी ओसरली आहे. दोन्ही मतदारसंघात महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारांनी आपल्या कुटूंबासह मतदान करुन राष्ट्रीय कर्तव्य बजावले आहे.  

मावळ लोकसभेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी सहकुटूंब थेरगाव येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी स्नुषा स्नेहा बारणे, पुत्र प्रताप बारणे, पत्नी सरिता बारणे, श्रीरंग बारणे, पुत्र विश्वजीत बारणे उपस्थित होते.

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी लांडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत सहकुटूंब मतदान केले. यावेळी पत्नी कल्पना आढळराव पाटील, मुलगा अक्षय आढळराव पाटील, स्नुषा माधुरी आढळराव पाटील आणि पुत्र अपुर्व उपस्थित होते.

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार डाॅ. अमोल कोल्हे यांनी सहकुटूंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पत्नी आश्विनी उपस्थित होत्या.

मावळ मतदार संघात विद्यमान नगरसेविका उषा ताई वाघेरे व काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी पिंपरीमध्ये आपल्या मतदान हक्क बजावला. यावेळी मावळचे महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार हे उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button