शिवसेना-भाजपकडे विकासाचे माॅडेल नाही – पार्थ पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/IMG-20190420-WA0015.jpg)
- भविष्यातील पाणी टंचाई, बेरोजगारी दूर करण्यास महाआघाडीला मत द्या
- उद्योगपतींना करमाफी दिली, पण शेतक-यांनी कर्जमाफी द्यायला तयार नाहीत
खारघर – नोटाबंदी, जीएसटी यामुळे देश संकटात सापडला आहे. लोकसंख्या वाढली आहे, परंतू पिण्याच्या पाण्याचे नियोजन नाही. विकासाचे माॅडेल नाही. नोक-या उपलब्ध केल्या जात नाहीत. भविष्यात पाणी टंचाई, बेरोजगारी आणि सरकारकडून कंपन्यावर होणारा अन्याय थांबविण्यासाठी महाआघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन पार्थ पवार यांनी केले.
खारघर येथील केंद्रीय विहार, सेक्टर- 11 झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी के.व्ही. फाईव्हचे माजी अध्यक्षा सी.आर. बलवान, आर.एल. सुतार, बी.व्ही.शिरखंड, सतीश पाटील, गुरुनाथ गायकर आदी उपस्थित होते.
पार्थ पवार म्हणाले की, गेल्या पाच वर्षात सेवानिवृत्त झालेल्या शासकीय अधिकारी व कर्मचा-यांना भाजप सरकारने त्रास दिला आहे. एकही विकास काम न करता विकास केल्याचा नुसता भास निर्माण केला जात आहे. केवळ तीन लोकांसाठी देशाला अडचणीत आणण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले आहे. या सरकारच्या तुघलकी कारभारामुळे देश संकटात सापडला आहे. कंपन्या अडचणीत आल्याने हजारो तरुणांना बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. शेतक-यांना कर्जमाफी अद्याप मिळालेली नाही. देशाला या संकटाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी महाआघाडीला मतदान करावे, आमच्याकडे बारामती सारखे विकासाचे माॅडेल आहे. ते माॅडेल मावळ लोकसभा मतदारसंघात राबवून या परिसराचा चेहरा-मोहरा बदलणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.