breaking-newsराष्ट्रिय
उद्यापासून बिपीन रावत अमेरिका दौऱ्यावर; भारत-अमेरिका सैन्य सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न करणार
नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलाचे प्रमुख बिपीन रावत हे उद्यापासून (२ एप्रिल) चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान बिपीन रावत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ अमेरिकेतील वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून ते भारत आणि अमेरिका सैन्यदलातील परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.