पंतप्रधान नरेंद्र मोदींना अजित पवारांची धास्ती, वर्धा येथील सभेत भावना व्यक्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/modi-varda_201904214876.jpg)
वर्धा – लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली प्रचारसभा वर्धा येथे झाली. केंद्र आणि राज्य सरकारने जी लोकाभिमुख कामे केली, त्याचे तोंड भरून कौतुक मोदींनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल मनातली धास्ती देखील पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात भाजपची मजबूत टीम नसल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना राज्यातील दुर्गम भागामध्ये सभा घेण्यासाठी यावे लागत आहे. हे पक्षाच्या दृष्टीने दुर्दैवाची बाब असल्याचे बोलले जात आहे.
- नरेंद्र मोदी हे भाजपचे राष्ट्रीय नेते आहेत. तरी, त्यांना माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची दुरदृष्टी आणि मुत्सद्दी राजकीय कलेची भिती वाटू लागली आहे. त्यामुळे मोदींनी पवार यांच्यावर टिका करायची सोडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट केले आहे. यावरून अजित पवार यांच्याबाबत मोदींच्या मनात धास्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. “अजित पवार यांना राष्ट्रवादीची सुत्रे हाती घ्यायची आहेत, आणि त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये कौटुंबिक वाद” असल्याची बाष्फळ वल्गना देशाचे पंतप्रधान मोदींनी केली आहे. वास्तविक, राष्ट्रवादीमध्ये कौटुंबिक वाद असला असता तर मावळ लोकसभा मतदार संघाच्या प्रचार सभेत शरद पवार आणि अजित पवार एका व्यासपीठावर आले असते का? असा प्रश्न सर्वसमान्यांना पडला आहे. परंतु, पंतप्रधानांच्या लक्षात न येणे ही अत्यंत दुर्दैवाची बाब मानली जात आहे.
शरद पवार देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. शरद पवार विचाराशिवाय कुठलीही कृती करत नाहीत, हे देखील पंतप्रधानांनी मान्य केले आहे. पवार यांना हवेतील बदल लक्षात येतो आणि त्यामुळेच त्यांनी माढा मतदार संघातून माघार घेतल्याचेही त्यांनी सांगितले, अशी टिका देखील मोदींनी केली. आणि हवेचा अंदाज येतो म्हणून त्यांनी मोहिते पाटील यांच्यासारख्या बलाढ्य घराण्याला भाजपमध्ये प्रवेश न करण्याचा सल्ला दिला होता. पवारांना त्यांची फसवणूक होणार हे कदाचीत माहित असावे, म्हणूनच त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजीतसिंह मोहिते पाटील यांची समजूत काढली होती. त्याचा प्रत्यय असा झाला की, भाजपने माढा लोकसभेच्या उमेदवारीचे अमिष दाखवून त्यांचा प्रवेश करवून घेतला. परंतु, त्यांना उमेदवारी न देता त्यांची घोर फसवणूक केली. हे पवार यांना अधिच माहित असावे. हे मोदींनी अचूक ओळखल्याचे त्यांच्या बोलण्यातून समोर आले आहे.
- देशाच्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी प्रत्येकाच्या बॅंक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. 2 कोटी युवकांना रोजगार देण्याचेही आश्वासन दिले होते. मेक इनद्वारे देशांतर्गत जागतीक गुंतवणूक वाढविणे, स्वच्छ भारत अभियान, स्मार्ट सिटी अभियान याद्वारे विकासाचे गाजर दाखविले होते. उलट देशात गेल्या पाच वर्षांमध्ये बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महिलांची असुरक्षितता गंभीर मुद्दा बनला आहे. बुवाबाजी वाढली आहे. एकाही नागरिकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख जमा नाहीत. शेतक-यांचे कर्ज माफ झाले नाही. उलट शेतक-यांच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत. 2015 ते 2018 या कालावधीत 12 हजारहून अधिक शेतक-यांनी राज्यात आत्महत्या केल्या आहेत. या मुद्यावर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्कार शब्द काढला नाही.
पंधरा वर्षात जे दिलं नाही, ते चार वर्षात विदर्भाला देण्याचा प्रयत्न केला आहे. पीक विम्यामध्ये शेतकऱ्यांना फायदा झाला. मागच्या सरकारमध्ये कर्जमाफीमध्ये वर्ध्याला ५२ कोटी मिळाले होते. आमच्या सरकारमध्ये कर्जमाफीत वर्ध्याला ४२८ कोटी मिळाले. वास्तवीक शेतक-यांच्या आत्महत्तेचे प्रमाण सर्वाधीक विदर्भातच आहे. केवळ आकड्यांचा फुगवटा सांगून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे, असा प्रश्न सुज्ञ नागरिक उपस्थित करत आहेत.