Breaking-news
श्रीदेवी मृत्यू प्रकरणाच्या स्वतंत्र चौकशीची मागणी फेटाळली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/sri-devi.jpg)
नवी दिल्ली – अभिनेत्री श्रीदेवी हिच्या मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी करणारी यचिका सर्वोच्च न्यायलयाने फेटाळून लावली आहे. गेल्या 24 फेब्रुवारीला श्रीदेवीचा दुबईतील एका हॉटेलात बाथटब मध्ये बुडुन मृत्यू झाला होता. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचा आदेश देण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका सुनिल सिंग नावाच्या याचिकाकर्त्याने केली होती.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ती काल फेटाळून लावली. या प्रकरणात दुबई आणि भारतातील अधिकाऱ्यांनी योग्य ती चौकशी केली आहे त्यात आम्हाला हस्तक्षेप करावा असे वाटत नाही असे न्यायालयाने या संबंधीच्या आदेशात नमूद केले आहे.