Breaking-news
कॅबिनेट सचिव सिन्हा यांच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा वाढ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/pradip-kumar-sinha.jpg)
नवी दिल्ली – कॅबिनेट सचिव प्रदीपकुमार सिन्हा यांच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. त्यांना आणखी वर्षभर म्हणजे पुढील वर्षी 12 जूनपर्यंत या पदावर सक्रिय राहता येणार आहे. याबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीने घेतला.
62 वर्षीय सिन्हा यांच मे 2015 मध्ये दोन वर्षांच्या कालावधीसाठी कॅबिनेट सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी 13 जून 2015 ला कार्यभार स्वीकारला. मागील वर्षी कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना वर्षभराची मुदतवाढ देण्यात आली. सिन्हा हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) 1977 च्या तुकडीचे उत्तरप्रदेश केडरचे अधिकारी आहेत. सिन्हा यांच्याआधी अजित सेठ यांनी चार वर्षे कॅबिनेट सचिवपदाची जबाबदारी सांभाळली.