breaking-newsपुणे
देहूरोड बाजारपेठेतील सायकल दुकानास भीषण आग
पिंपरी – देहूरोड येथे बाजारपेठेतील एका सायकलीच्या दुकानासा भीषण आग लागली. अग्नीशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
देहूरोड येथे बाजारपेठेत खन्ना सायकलीचे दुकान आहे. या दुकानाला आज सकाळी पावणेअकराच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. माहिती मिळताच देहुरोड कॅन्टोनमेंट बोर्डाची एक आणि पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाची एक अशा दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.