‘वसंतदादा पाटील यांच्या घराची अक्षरशः वाट लावली’, चंद्रकांत पाटील यांची कॉंग्रेस, राष्ट्रवादीवर टिका
सांगली, (महा-ई-न्यूज) – प्रतिक पाटील हे माजी मुख्यमंत्री वसंदादा पाटील यांचे नातू आहेत. सांगलीची जागा काँग्रेस राजू शेट्टी यांच्यासाठी सोडत असल्याने प्रतिक पाटील हे नाराज होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेच वसंतदादा घराण्याची वाट लावली, अशी सणसणीत टीका महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
लोकसभेच्या मतदानाला काही दिवस शिल्ल्क राहिले आहेत. त्यातच माजी राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यामुळे काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. आता चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक पाटीलांवरून काँग्रेस-राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केल्याने सांगलीत वेगळाच राजकीय वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
काँग्रेसमध्ये राहून अपमान सहन करू नका, भाजपमध्ये या, पायघड्या घालून तुमचे स्वागत करू, असंही त्यांनी जाहीर केलं आहे.