माझा बोलण्यावर नव्हे, कामावर विश्वास आहे – पार्थ पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/FB_IMG_1553763679914.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – ” मी पार्थ बोलून दाखवत नाही, तर गावपातळीवरील समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडवण्यावर भर देणार आहे. मला तुम्ही निवडून दिल्यावर गावचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी निश्चित प्रयत्न करेन, असे आश्वासन मावळचे राष्ट्रवादी-काॅंग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी शेतक-यांशी बोलताना दिले.
मावळातील विविध गावामध्ये आज (गुरुवारी) कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांच्या भेटी-गाठी घेतल्या, तसेच शेतात काम करणा-या शेतकरी व महिला भगिनींशी संवाद साधला. शेतक-यांच्या बांधावरुन त्याच्या अडचणी जाणून घेतल्या. या सरकारमुळे शेतकरी वर्गाचे किती नुकसान झालं आहे. त्यांची आर्थिक बाजू किती कमकुवत झाली आहे, अशा अनेक अडचणी पार्थ पवार यांना सांगितल्या. यावेळी पार्थ पवारांनीही शेतकरी कुटुंबांना शब्द दिला, “पार्थ बोलून दाखवत नाही, तर काम कशाप्रकारे शासनाकडून करुन घ्यायचे यावर भर देतो. मी जर खासदार झालो तर गावपातळीवर निश्चित विकास करेन”, असं आश्वासनही पार्थ पवार यांनी शेतकऱ्यांना दिले.
रिक्षा, लोकलनंतर बैलगाडीतून पार्थचा प्रवास
दरम्यान, पार्थ पवार यांच्या प्रचारादरम्यान आतापर्यंत रिक्षा, रेल्वे तसेच आज बैलगाडीतून पार्थनं प्रवास केला. आज मावळ विधानसभेत पार्थ यांचा प्रचार सुरु होता. यावेळी मावळ तालुक्यातील शिवणे गावात पार्थ यांनी बैलगाडीत बसून थेट सारथ्य केलं. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पार्थ वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत.