कन्हैया कुमारचे ‘या’ भाजप नेत्याला आव्हान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/images-3.jpg)
पटना – भारतीय जतना पक्षाची बिहारमधील मित्र पक्षासोबतची जागा वाटपाची बोलणी पूर्ण झाली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि जनता दल युनायटेड प्रत्येकी १७ जागा लढविणार असून लोक जनशक्ती पक्षाला ६ जागा देण्यात आल्या आहेत. बिहारचे प्रदेशाध्यक्ष पशुपती पारस यांनी युतीची घोषणा केली आहे. यामध्ये भाजप नेते गिरीराज सिंह आणि शहनवाज हुसैन यांची जागा मित्र पक्षाच्या वाट्याला गेली आहे. त्यामुळे गिरीराज सिंह यांचा मतदार संघ बदलणार असून त्यांच्या समोर जेएनयू नेते कन्हैया कुमार यांचे आव्हान असण्याची शक्यता आहे.
गिरीराज सिंह यांचा नवादा मतदारसंघ लोक जनशक्ती पार्टीकडे गेला आहे. त्यामुळे गिरीराज सिंह बेगूसराय मतदार संघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. बेगूसरायमधून भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून कन्हैया कुमार .यांना तिकीट निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर रामविलास पासवान यांना आसाममधून राज्यसभेवर पाठविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.