शिवछत्रपती शिवाजीराजे विद्यालयास अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिली भेट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/IMG-20190314-WA0004.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पुण्यातील अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी चिंचवड येथील श्री शिवछत्रपती शिवाजीराजे विद्यालयास नुकतीच भेट दिली. शाळेतील सायन्स पार्क सेंटर, गणित, भूगोल, इंग्रजी अशा विविध विषयांच्या अत्याधुनिक प्रयोगशाळा पाहून देशमुख यांनी कौतुक केले.
यावेळी शाळेच्या वतीने विजयसिंह देशमुख यांचा सत्कार झाला. संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जाधव, उपाध्यक्ष जगदीश जाधव, संचालक विजय जाधव यांनी पुणेरी पगडी, उपरणे आणि दगडुशेठ गणपतीची प्रतीकृती देऊन देशमुख यांचा सत्कार केला. यावेळी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अमित बच्छाव उपस्थित होते.
विजयसिंह देशमुख म्हणाले की, “ शिवाजीराजे शाळा ही एक आदर्श शाळा आहे. विद्यार्थ्यांना ज्ञान वाढीसाठी शाळेतील सायन्स पार्क सेंटरमधील आगळ्यावेगळ्या गणित, भूगोल, इंग्रजी व विविध प्रकारच्या अत्याधुनिक प्रयोग शाळेचा फायदा होत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचा शिस्तबद्दपणा कौतुकास्पद आहे. देशसेवेसाठी तरुणांची चांगली पीढी ही शाळा निर्माण करीत आहे. याचा अभिमान वाटतो. ‘आण्णांनी’ कमी शिक्षण घेवून देखील फार मोठी शैक्षणिक संस्था उभी केली. ही शाळा म्हणजे समाजामध्ये एक अनोखा आदर्श आहे.