breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
मावळातील 589 दिव्यांग व्यक्तींना साहित्याचे होणार वाटप
– खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून साहित्याचे वाटप
थेरगाव ( महा ई न्यूज ) – मावळ लोकसभा मतदार संघातील 589 दिव्यांग व्यक्तींना केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयातून गुरुवारी (दि.7) थेरगांवच्या मोरया मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता विविध साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार ,संपर्क प्रमुख बाळा कदम, मावळ जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, महिला संपर्क प्रमुख वैशाली सूर्यवंशी, शादानभाभी चौधरी, शहरप्रमुख योगेश बाबर, उर्मिला काळभोर, राजू खांडभोर, गटनेते राहु ल कलाटे, वैभव थोरात, विस्तारक प्रमोद कुटे, अनंत को-हाळे, आदी मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नाने आणि केंद्र सरकारच्या दिव्यांग विभाग, सामाजिक न्यायमंत्रालय यांच्या वतीने मावळ लोकसभा मतदार संघात विधानसभा मतदार संघ निहाय साहित्याचे वाटप करण्यात येईल, याकरिता पनवेल, कर्जत, मावळ आणि पिंपरी चिंचवड दिव्यांग व्यक्तीना मदत मिळणेसाठी तपासणी कॅम्प घेण्यात आले होते. या तपासणी कॅम्पमधून पात्र झालेल्या एकूण ५८९ व्यक्तीना मदत साहित्य वाटप करण्यात येणार आहे. असे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकांत म्हटले आहे.