रहाटणी : सिटी प्राईड शाळेतील विज्ञान प्रदर्शनात विविध प्रयोगांचे सादरिकरण

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रयोगाचे सादरिकरण केले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, मंजुळा मुदलियार, मुख्याध्यापिका श्राबणी पत्रनाभिश, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
पालक प्रतिनिधी सविता काळे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. “प्रत्येक मुलगा हा शास्त्रज्ञ बनू शकला नाही तरी, भविष्यात तो ज्या कोणत्या क्षेत्रात जाईल. तेथे तो त्या गुणांमुळे नक्कीच त्याच्या कार्यक्षमतेला चालना मिळेल. मुलांमधील कौशल्य, सर्जनशिलता, एकाग्रता, यासारख्या गुणांना विज्ञान प्रकल्प स्पर्धातून प्रोत्साहन मिळते. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन अंगी बाळगला पाहिजे. नवनवीन संकल्पनांच्या आधारे विविध वैज्ञानिक प्रयोग करावे”, असे आवाहन संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी विद्यार्थ्यांना केले.
या प्रदर्शनात विद्यार्थांनी पाणी वाचवा, पाणी जिरवा, कारचे मॉडेल्स, शेतीचे महत्व, डायजेस्टीव सिस्टम, एटीएम मशिन, पॉपकॉर्न मशिन, हार्ट सर्क्युलेटरी सिस्टम, सोलर सिस्टम, रोबोट, वॉटर कुलर, टेबल पंखा, विंड मिल, व्हॅक्यूम मशिन, वेस्ट आउट ऑफ बेस्ट, इलेक्ट्रिक पंखा, प्रोजेक्टर, ऑटो कार, स्मार्ट सिटी, रोबोट, सौर, पवन, जल, विद्युत आणि चुंबकीय ऊर्जेवर चालणारे स्वयंचलित प्रकल्प सादर केले. तसेच, हस्तकलेच्या विविध वस्तूंचे प्रदर्शन सादर केले. या विविध प्रकारांच्या उपक्रमांनी पालकांचे लक्ष वेधून घेतले. पालकांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.





