अभिनंदनना बॉर्डरपर्यंत सोडणारी ‘ती’ महिला कोण?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/1.jpg)
नवी दिल्ली – जिगरबाज विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची अखेर शुक्रवारी रात्री पाकिस्तानकडून सुटका करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून पाकच्या ताब्यात असलेले अभिनंदन यांनी डौलदार पावले टाकीत स्मितवदनाने पाकिस्तानी सीमारेषा ओलांडली. पाकची सीमारेषा ओलांडताना अभिनंदन यांच्यासोबत एक महिला होती. त्यांच्यासोबत त्या महिलेला पाहताच सर्वांच्या मनात ती महिला कोण असा प्रश्न उभा राहिला.
पाकची सीमारेषा ओलांडताना अभिनंदन यांच्यासोबत असणारी महिला ही त्यांच्या परिवारातील नसून ती एक पाकच्या विदेशी कार्यालयातील ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यांचे नाव डॉ. फरेहा बुग्ती असे आहे. त्या पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे संचालिका आहेत. त्यांचे स्थान भारताच्या परराष्ट्र सेवा अधिकाऱ्याप्रमाणे आहे. पाकच्या कारावासात कैद असलेल्या भारतीय कुलभूषण जाधव यांचे प्रकरणदेखील फरेहा बुग्ती हाताळत आहेत.