सोनाक्षी सिन्हाविरोधात फसवणुकीचा गुन्हा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/sonakshi_1971178_835x547-m.jpg)
मुंबई – बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा हिच्यासह पाच जणांविरोधात 32 लाख रुपये घेऊन फसवणुक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी सोनाक्षीने पैसे घेतले परंतु ऐनवेळी ती हजर राहिलीच नाही, म्हणून तिच्याविरोधात उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथील इंडियन फॅशन अँड ब्युटी अवॉर्ड्स कंपनीचे मालक प्रमोद शर्मा यांनी तक्रार दाखल केली. तक्रार दाखल करूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने प्रमोद शर्मा यांनी १३ फेब्रुवारी रोजी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी सोनाक्षी सिन्हा, टॅलेंट फुल ऑन कंपनीचे अभिषेक सिन्हा, मालविका पंजाबी, धुमिल ठक्कर आणि एडगर सकारीया यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची तपासणी पूर्ण झाली असून सोनाक्षीसह इतर आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच तक्रारदाराने पोलिसांवर दबाव आणण्यासाठी विष प्यायल्याचे पोलिसांनी म्हटले.