Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
विद्यार्थिनीच्या छळप्रकरणी प्राध्यापक बडतर्फ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/Rape.jpg)
विद्यार्थिनीचा छळ केल्याची तक्रार असणाऱ्या शहरातील एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाला शनिवारी बडतर्फ करण्यात आले.
महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील एका प्राध्यापकाने लैंगिक छळ केल्याची तक्रार संबंधित महाविद्यालयातील विद्यार्थिनीने केली होती. गावदेवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतरही महाविद्यालयाने मात्र संबंधित प्राध्यापकावर कारवाई केली नाही. याबाबत विद्यापीठाच्या अधिसभेच्या आणि युवा सेनेच्या सदस्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्याची भेट घेऊन संबंधित प्राध्यापकाच्या निलंबनाची मागणी केली. त्यानंतर महाविद्यालयाने या प्राध्यापकाला बडतर्फ केले. महाविद्यालयात महिला अत्याचार विरोधी समितीही कागदोपत्रीच होती. आक्षेप घेतल्यावर ती कार्यरत झाली असल्याचे सदस्यांनी सांगितले.