अन्ं महापाैरांनी विचारले ; तुमचे वय किती ?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/महापैार.jpg)
पिंपरी – महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका आश्विनी बोबडे यांनी विधी समितीत काम करण्याची इच्छा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे व्यक्त केली होती. परंतू, त्यांना विधी समितीत संधी न देता, त्यांची क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सदस्य पदावर निवड केल्याचे शुक्रवारी महासभेत जाहीर करण्यात आले. यावर नगरसेविका बोबडे यांनी महासभेत नाराजी व्यक्त करीत आपण क्रीडा समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगून पक्षातील आयाराम नगरसेवकांवर निशाणा साधला. तसेच निष्ठावंतावर पक्षाचे नेते अन्याय करीत असल्याचे त्यांनी म्हटले. त्यावेळी महापाैर नितीन काळजे यांनी या विषयावर इथे बोलू नका, असे सांगताना थेट तुमचे वय किती ? असा प्रश्न केला. यावेळी महापाैरांच्या या प्रश्नावर सभागृहातील महिला नगरसेविका निःशब्द झाल्या. याप्रसंगी महापाैरांना त्यांची चूक लक्षात येताच त्यांना संबंधित नगरसेविकेला खाली बसण्यास सांगितले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विषय समिती सदस्यांची निवडी आज (शुक्रवारी) महासभेत जाहीर करण्यात आल्या. महापालिकेतील पक्षीय बलाबलानूसार सत्ताधारी भाजपच्या पाच, राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या तीन आणि शिवसेनेची एक अशा एकूण 9 सदस्यांची निवड चार विषय समितीत करण्यात आली. यावेळी सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका असलेल्या आश्विनी भीमा बोबडे यांची क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या सदस्य पदी निवड करण्यात आली. परंतू, त्यांनी मला विधी समितीत काम करण्याची इच्छा पक्षाच्या नेत्यांकडे व्यक्त केली होती. तरीही त्यांच्या मना विरुध्द अन्य समितीवर त्यांची निवड करण्यात आली. याबाबत शुक्रवारी झालेल्या महासभेत नगरसेविका बोबडे यांनी सत्ताधारी भाजपवर नाराजी व्यक्त करुन क्रीडा समिती सदस्य पदांचा तडकाफडकी राजीनामा देत असल्याचे सांगितले. तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर आरोप करीत त्या म्हणाल्या की, तुम्ही, अन्य पक्षातून भाजपात आलेल्या लोकांना संधी देता, पण 1992 पासून पक्षाचे निष्ठेने काम करणा-यांवर अन्याय करता, असा शब्दांत पक्षावर नाराजी व्यक्त केली. यावर महापाैर नितीन काळजे यांनी या विषयांवर तुम्ही इथे बोलू नका, असे सांगत तुमचे वय किती ? असा प्रश्न केल्याने सभागृह अवाक् झाले. दरम्यान, महापाैर नितीन काळजे यांना आपली चुक लक्षात येताच त्यांनी तत्काळ संबंधित नगरसेविका बोबडे यांनी तुमचे म्हणणे ठिक आहे, तुम्ही खाली बसा, असे सांगून त्यांना खाली बसविले. यावेळी सभागृह नेते ए कनाथ पवार यांनी नगरसेविका आश्विनी बोबडे यांच्याकडे जाऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत होते.