Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपुरच्या विठ्ठलाचीही तिरंग्याला ‘सलामी’
पंढरपूर – देशभरात ७० वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असतानाच पंढरपुरातील विठ्ठल मंदिरही यामध्ये मागे राहिलेलं नाही. ठिकठिकाणी ध्वजारोहण करत एकमेकांना शुभेच्छा देत असताना विठ्ठल मंदिरही तिरंगी फुलात सजविण्यात आलं आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मंदिर समितीने विठ्ठल मंदिराला तिरंगी फुलांची आकर्षक सजावट केली आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त विठुरायालादेखील तिरंगी रंगात नटवण्यात आलं आहे. विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यासह, चौखांबी व सोळखांबीमध्येही तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. यामुळे मंदिरात येणाऱ्या भक्तांना विठुरायाचं दर्शन घेताना प्रजासत्ताक दिनाचाही अनुभव घेण्यास मिळत आहे.