Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इंडियन डेंटल असोसिएशन ऑफ पिंपरी-चिंचवडच्या अध्यक्ष पदावर डॉ. दिपाली पाटेकर यांची निवड

पिंपरी ( महा ई न्यूज ) – इंडियन डेंटल असोसिएशन ऑफ पिंपरी-चिंचवड शाखेच्या अध्यक्ष पदावर डॉ. दीपाली पाटेकर यांची निवड झाली. चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमात यावेळी निवड झाली. मावळते अध्यक्ष डॉ. विकास बेनगुडे यांनी त्यांच्याकडे अधयक्षपदाची सूत्रे दिली. डॉ. अनुजा कृष्णा यांची सचिव पदी निवड करण्यात आली.

कोषाध्यक्ष म्हणून डॉ. मनीषा सुकाळे यांची तर डॉ. प्रतिभा भोसले, डॉ. स्वप्ना निकाजू, डॉ. मोना दिवाण आदींची कार्यकारणीवर निवड करण्यात आली. यावेळी डॉ. माउली फरांदे, डॉ. राकेश प्रसाद, डॉ. संदीप भिरूड, डॉ. यशवंत इंगळे, डॉ. मनीषा गरुड, डॉ. विकास बेनगुडे आदी उपस्थित होते. यावर्षीच्या इंडियन डेंटल असोसिएशन ऑफ पिंपरी-चिंचवड शाखेच्या कार्यकारणीमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. यावर्षी दातांची निगा, स्वच्छता आणि मुख कर्करोग यांसारख्या विषयांवर प्रबोधन करण्यात येणार आहे, अशी माहिती नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ. दीपाली पाटेकर यांनी दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button