Breaking-newsराष्ट्रिय
‘एचएएल’ कंत्राटांची कागदपत्रे दाखवा, अन्यथा राजीनामा द्या!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/Nirmala-Sitharaman.jpg)
- राहुल गांधी यांची निर्मला सीतारामन यांच्याकडे मागणी
हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) १ लाख कोटींची कामे दिल्याचा दावा संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केला. त्यांनी या कंत्राटांबाबत कागदपत्रे सादर करावीत किंवा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
आतापर्यंत ‘एचएएल’ या सरकारी कंपनीला १ लाख कोटी रुपयांची कामे दिल्याचे सीतारामन यांनी म्हटले असले तरी त्यातील एक रुपयाचे काम त्यांना मिळालेले नाही, असा आरोप राहुल यांनी केला. आपल्या उद्योजकमित्रांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एचएएल’चा पैसा उधळला. त्यामुळे ही कंपनी कमकुवत झाली असून, त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी पैसे नसल्याने कोटय़वधींचे कर्ज घेण्याची वेळ आली, असे गांधी म्हणाले. दरम्यान, राहुल हे देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोप सीतारामन यांनी केला.