“गली बॉय’साठी रणवीरचे रॅप सॉंग?
झोया अख्तर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग, आलिया भट्ट यांची मुख्य भूमिका असलेल्या “गली बॉय’ चित्रपट अंतिम टप्प्यात आहे. “गली बॉय’मध्ये झोपडपट्टीत लहानचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नासाठी धडपडणाऱ्या 26 वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा पाहायला मिळणार आहे.
रणवीर सिंग ट्रेलर रिलिजची तारीख जाहीर करताना प्रदर्शित करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये एक रॅप सॉंग गाताना दिसत आहे. तसेच या व्हिडीओवरून एकंदरितच चित्रपटामधील प्रत्येक भूमिकेची झलकही दाखवण्यात आली आहे.
धारावीमध्ये “गली बॉय’चे बरचेस चित्रिकरण करण्यात आले आहे. हे आज प्रदर्शित करण्यात आलेल्या व्हिडीओत दिसत आहे. रणवीर सिंग, आलिया भट, कल्की कोचलिन, अमृता सुभाष असे सर्वच कलाकार या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. ट्विटसहीत सर्वच सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा दिसून येत आहे.
हा व्हिडीओ रणवीर सिंग, अभिषेक बच्चन, अर्जून कपूर, आलिया भट, करण जोहर, अशा अनेक कलाकारांनी शेअर केल्याने हे हॅशटॅग ट्रेण्डिंग होताना दिसत आहेत. येत्या “व्हॅलेंटाइन डे’ला म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी गली बॉय’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.