‘पीएमपी’च्या वाहतूक व्यवस्थापक पदाचा पदभार गवळीना देवू नये – महापाैर राहूल जाधव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/644c110d0cb88b3ca02261c34358be84.jpg)
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना पत्र
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड कंपनीच्या वाहतूक व्यवस्थापक पदाचा पदभार सुनिल गवळींना देण्यात येवू नये, अशी मागणी महापाैर राहूल जाधव यांनी केली.
पीएमपी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांना पत्र दिले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड कंपनीच्या वाहतूक व्यवस्थापक पदाचा पदभार सुनिल गवळी यांना दिला आहे. परंतू, गवळी यांची खातेनिहाय चाैकशी सुरु आहे. त्याच्यावर गंभीर आराेप असून ती चाैकशी देखील पुर्ण झालेली नाही. त्याचा चाैकशी अहवाल प्राप्त झाल्याशिवाय त्यांना वाहतूक व्यवस्थापक पदाचा पदभार देण्यात येवू नये. तसेच त्या वाहतूक व्यवस्थापक पदाचा पदभार अनुभव असणा-या सेवाज्येष्ठ अधिका-यांना देण्यात यावा, याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी महापाैर जाधव यांनी केली आहे.